राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना ‘बळीराजाची सनद’

0
जळगाव  / राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 व्या स्थापनादिनानिमीत्त आज जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांना ‘बळीराजाची सनद’ हे शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 19 वा स्थापना दिन असुन त्यानिमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी 10. 10 वा. आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना ‘बळीराजाची सनद’ हे शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी खा. ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, राजेश पाटील, विलास पाटील, योगेश देसले, सलीम ईनामदार, राजू बाविस्कर, शालीग्राम मालकर, बापू परदेशी, नामदेव चौधरी, निलेश पाटील, संदीप पवार, अ‍ॅड. सचिन पाटील, रोहन सोनवणे, मंगला पाटील, निला चौधरी, प्रतिभा शिरसाठ, लता मोरे, सविता बोरसे, मनिषा देशमुख, ममता तडवी, किशोर पाटील, महाडीक, संजय चव्हाण, एन.डी.पाटील, आशा येवले, शोभा भोईटे, चंद्रकांत चौधरी, आसीफ कपाटवाला, रोहन सोनवणे, अयाज अली, प्रा. सुनिल गरूड, डॉ. अनिल पाटील, गणेश नन्नवरे, गणेश निंबाळकर, निला चौधरी, दिलीप पवार, ललित बागुल, राजेश गोयल, रमेश पाटील, पंकज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुत्रसंचालन व आभार सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

*