राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांमध्ये हातघाई!

0

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांमध्ये आज शाब्दिक वाद होवून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात येवून हा वाद हातघाईवर आला. परंतु जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांनी मध्यस्थी करुन सध्या तरी वादावर पडदा टाकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आज भाजपाचे आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील राणाप्रताप चौकात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर सौ. कल्पना महाले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मनिषा ठाकरे, प्रविणा भावे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आ. राम कदम यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारुन त्यानंतर पोस्टर जाळण्यात आले. आंदोलनानंतर महापौर महाले या ठिकाणाहून निघून गेल्या. हा कार्यक्रम संपल्यानंतर एका संकुलासमोर सर्व पदाधिकारी थांबलेले होते. त्याचवेळी त्या दोन महिला पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर हे प्रकरण हातघाईपर्यंत आले. परंतु जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांनी मध्यस्थी केली. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या वादाची आज दिवसभर महापालिका चौकात दबक्या आवाजात चर्चा ऐकण्यास मिळत होती.

मला काहीच माहिती नाही!
भाजपाचे आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील महाराणा प्रताप पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलन शांततेत पार पडले त्यानंतर एका कामासाठी आंदोलन स्थळावरुन मी बाहेर गेली होती. त्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या त्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये काय वाद झाला हे मला माहिती नाही.
– सौ.ज्योती पावरा, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा

LEAVE A REPLY

*