राष्ट्रवादीचा महापालिकेत ठिय्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेने शहरात बसविलेले पथदिवे अनेक ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे शहरात सगळीकडेच आंधाराचे साम्राज्य पसरले आहे. इलेक्ट्रीक विभागाला मागणी केल्यानंतर साहित्य उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते.

महापालिकेच्या या कारभाराचा निषेध करून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी शनिवारी दुपारी आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी आयुक्त दिलीप गावडे यांच्या नावाच्या बोर्डला बल्बचा हार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली. प्रभारी आयुक्त विलास गावडे यांच्या लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात धूम स्टाईल चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. शहरात महापालिकेचे पथदिवे आहेत, मात्र त्यावर दिवेच नाहीत. दिवे नसल्याने शहरात सगळीकडेच आंधार आहे. विविध चौकात व महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. नगरसेवकांनी पथदिवे सुरू करण्यासंदर्भात वायरमन किंवा संबंधित अधिकार्‍यांना फोन केला तर साहित्य उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते.

 

महापालिकेचा या ढिसाळ कारभाराचा निषेधम्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, आरीफ शेख, विपुल शेटिया, अविनाश घुले, संभाजी पवार, विजय गव्हाळे, जय भोसले, काँग्रेसचे निखील वारे, प्रकाश भागानगरे, माणिक विधाते, अजय चितळे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सारंग पंधाडे, ऋषीकेश ताठे, गजानन भांडवलकर, संकेत कराड यांनी आयुक्त दिलीप गावडे यांच्या नावाच्या बोर्डला बंद असलेल्या बल्बचा हार घालून घोषणा दिल्या.

 

प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांच्यासमोर आघाडीच्या नगरसेवकांनी कैफियत मांडली. लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आघाडीच्या नगरसेवकांनी घेतली. त्यानंतर आयुक्त वालगुडे यांनी इलेक्ट्रीक सप्लायरला मागील देयके अदा करून आठ दिवसांत साहित्य उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*