राष्ट्रपती ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे’चेच होतील : अमित शहा

0

देशाचे पुढील राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच (NDA) होतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला.

ते एका कार्यक्रमात बोलत होते.

काश्मीरमधील परिस्थिती, ईव्हीएम, नोटाबंदी आणि अन्य मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले.

ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांवरून अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी (विरोधक) निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएम योग्य होते. पण आम्ही निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांचे हे आरोप जनता मान्य करणार नाही. आता जातीवाद आणि धर्माचे नव्हे तर विकासकामांचे राजकारण चालते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

 

LEAVE A REPLY

*