राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे मुंबईत स्वागत

0

राष्ट्रपतिपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आज (शनिवारी) मुंबईसह गोव्याच्या दौरा करणार आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विमानतळावर उपस्थित रहाणार आहेत.

रामनाथ कोविंद मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये भाजपचे ज्येष्‍ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. मात्र या दौऱ्यात ते ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याचे समजते आहे .

LIVE UPDATE : 

मुंबई विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत झाले.

कोविंद यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित होते.

आजच्या दौऱ्यात कोविंद एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदारही उपस्थित आहेत.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, रामदास आठवले, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजप आणि घटकपक्षांचे नेते उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

*