रावेरचा वेटलिफ्टर करणार खेलो इंडिया मध्ये देशाचे प्रतिनिधित्व

0

रावेर |दि.९| प्रतिनिधी
येथील सरदार जि.जि.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तथा जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू अभिषेक गणेश महाजन यांची निवड समिती भारतीय वेटलिफ्टिंगतर्फे औरंगाबाद येथे होणाऱ्या खेलो इंडिया खेलो वेटलिफ्टिंग सराव शिबिराकरीता निवड झाली आहे.

अभिषेक महाजन याने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.आता या निवडीने मुख्याध्यापक कोल्हे,सर्व क्रीडा शिक्षक,जिल्हा संघटनेचे प्रदीप मिसर,संजय मिसर,राजेश शिंदे,आमोद महाजन,प्रकाश बेलस्कर,व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक,प्राचार्य पी.व्ही. दलाल,उमेश पाटील यांनी त्याचे अभिनंदन, कौतुक केले.वेटलिफ्टिंग प्रशिक्षक अजय महाजन,नितीन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

LEAVE A REPLY

*