रायपूर येथे जलदिन साजरा

0

रायपूर, ता.जळगाव | वार्ताहर :  येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात जल सप्ताहाचे दि.१६ ते २२ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जनजागृती म्हणून जल महत्व सांगणारे बॅनर लावण्यात आले होते. तसेच दि.२२ रोजी जलदिनानिमित्त प्रतिज्ञा करण्यात येवून ग्रामस्थांना पाण्याचे महत्व, पाण्याची काटकसर याबाबत विषद माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली.

जिल्हा परिषद शाळेत सकाळी ११ वा. मुख्याध्यापक मिलींद कोल्हे, शिक्षक अरूण सोनवणे, परमान तडवी, छाया चौधरी, निर्मला विधाते, सुनंदा सैंदाणे, सुरेखा पाटील, महेंद्र वाणी, कल्पना पाटील, छाया राजपूत, जगदीश जाधव, अंशकालीन निर्देशक पुनम परदेशी, प्रियंका निकुंभे, छाया सुर्वेे, तसेच वाघुर धरण विभागाचे स्थापत्य अभियंता जे.एस.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बापू पाटील उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका पल्लवी मोरे, पोलीस पाटील रामसिंग परदेशी, सरपंच ताराबाई भिमसिंग परदेशी, ग्रा.पं.सदस्या सौ.भारती गजेंद्र परदेशी, सोनाली प्रकाश परदेशी, योगिता चरण सुर्यवंशी, सदस्य नकुल गंगाराम कोळी, राजू बिसनसिंग परदेशी, गजेंद्र परदेशी, सुनिल जुलालसिंग परदेशी, प्रमोद हरचंद परदेशी, संदीप सीताराम परदेशी, ग्रा.पं.कर्मचारी सतीश शेनपडू परदेशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*