रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल महाराष्ट्रातील दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

0

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वॉट्सअप ग्रूपवर टाकल्याबद्दल महाराष्ट्रातील दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील एका वॉट्सअपग्रूपवर राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरण्यात आले. एका मुख्याध्यापकाने ही पोस्ट एका वॉट्सअपग्रूपवर टाकली आणि दुस-या एका मुख्यध्यापकाने त्याचे समर्थन केले. यावरुन दोघांविरोधात सोनपेठ ग्रामिण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनपेठ भाजप तालुका अध्यक्ष महादेव गिरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही शिक्षक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळं सोनपेठच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

*