राणी रातमपालला भारताच्या ध्वजधारकाचा मान

0
जकार्ता । आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताच्या खात्यात एकूण 69 पदके जमा झाली. आजवरच्या आशियाई खेळांमधील ही भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

आशियाई स्पर्धेची सांगता सोहळा आज रंगला. या स्पर्धेत समारोपाच्या कार्यक्रमात भारताच्या ध्वजधारकाचा मान भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपालला मिळाला. भारतीय ऑॅलिम्पिक असोसिएशनने याबाबत माहिती दिली. भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 4.30 वाजता समारोपाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली.

18 व्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताच्या पदरी 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्यसह एकूण 69 पदके जमा आहेत. ही आशियाई क्रीडा इतिहासातील भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2010 च्या आशियाई खेळांमध्ये भारताने 14 सुवर्ण, 17 रौप्य आणि 34 कांस्य असे मिळून एकूण 65 पदके जिंकली होती. आशियाई स्पर्धेच्या क्रमवारीमध्ये भारत 8 व्या स्थानी आहे.

या क्रमवारीमध्ये चीन 131 सुवर्ण 90 रौप्य आणि 65 कांस्य, अशा 286 पदकांसह अव्वल स्थानी आहे. तर जपान 72 सुवर्ण 54 रौप्य आणि 74 कांस्य मिळून 200 पदकांसह दुसर्‍या स्थानी आहे. तर कोरिया 48 सुवर्ण 57 रौप्य आणि 68 कांस्य मिळून 173 पदकांसह तिसर्‍या स्थानी आहे.

राणी रामपालच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने 20 वर्षांचा आशियाई खेळातील पदकांचा दुष्काळ संपवला. अंतिम फेरीत भारतीय महिलांना जपानकडून 1-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागले.

LEAVE A REPLY

*