‘राझी’ चित्रपटामध्ये आलियाबरोबर स्क्रीन शेयर करणार अमृता!

0
अमृता खानविलकर लवकरच हिंदीतील एका मोठ्या चित्रपटात झळकणार आहे.
‘राझी’ चित्रपटाच्या निमित्ताने अमृता आलिया भट आणि विकी कौशल यांच्याबरोबर पडद्यावर झळकणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन या मोठ्या बॅनरमध्ये काम करण्याची संधी अमृताला मिळाली आहे.
अमृताने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.
अमृताने सोमवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचे शुटिंग झाल्याचे जाहीर केले. या चित्रपटात अलिया भट आणि विकी कौशलबरोबर अमृताची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
ट्विटरवर फोटो पोस्ट करत अमृताने लिहिले, “#newrole.. start of a #newjourney with some awesome people … 1 st day on the sets of #Raazi … ganapati bappa moraya.”

LEAVE A REPLY

*