राज ठाकरे यांची मुलगी बनली ‘जुडवा-२’ चित्रपटाची ‘सहाय्यक दिग्दर्शक’!

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिने लवकरच रिलीज होणार असलेल्या ‘जुडवा-२’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

डेविड धवनने सांगिलते की, मी जेव्हा पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा मला असे वाटले की, ती शूट करू शकणार नाही. परंतु, या प्रोजेक्टसाठी तिने प्रचंड मेहनत केली आहे. वास्तविक ती खूप मेहनती असून, खूपच कमी कालावधी ती आमच्या क्रूमध्ये मिसळली होती.

‘जुडवा-२’विषयी सांगायचे झाल्यास हा चित्रपट सलमान खान याच्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा रिमेक आहे. आता या चित्रपटाला २० वर्षे होत आहे. रिमेकमध्ये वरूण धवन प्रमुख भूमिकेत असून, जॅकलिन फर्नाडिस आणि तापसी पन्नू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

*