Type to search

धुळे

राज्य शिक्षक परिषदेतर्फे निदर्शने

Share

धुळे | विस टक्के अनुदान प्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांना, तुकड्यांना नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या धुळे महानगर शाखेतर्फे निदर्शने करण्यात आली.

अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या तसेच नैसगिक वाढीच्या सर्व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करून प्रचलित नियमानुसार प्रत्यक्षात अनुदान द्यावे, वीस टक्के अनुदान प्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांना तुकड्यांना नियमानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे, कायम विना अनुदानीत विद्यालयांचा कायम शब्द काढून विद्यालयांना अनुदान द्यावे, अंशतः अनुदानीत शाळेतील अतिरीक्त शिक्षक कर्मचार्‍यांना इतर शाळेत समायोजन करून संरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मागण्यांसाठी शिक्षकदिनी काळा दिवस पाळुन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. तरी आता तरी मागण्या निकाल काढाव्यात अशी मागणी सुनिल मोरे, अशोक गिरी, नितीन कापडणीस यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!