राज्यस्तरीय घोडेस्वारी स्पर्धेत पटेल सीबीएसई स्कूलचे वर्चस्व

0
शिरपूर । पुणे येथील जापालूप इक्वेस्टेरियन सेंटर येथे संपन्न झालेल्या राज्य स्तरीय घोडेस्वारी स्पर्धेत श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेश आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या संघाने उत्तम कामगिरी बजावली.

स्लो जम्पिंग, बॉल एन्ड बकेट, पोल एन्ड बेंड आणि फ्लॅग रेस अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून गोल्ड सिल्वर व ब्रांज अशा एकूण 18 पदकांची कमाई केली.

या यशाबद्दल एस व्ही के एम संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, विश्वस्त तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर, एस.ई.एस. सीईओ डॉ. उमेश शर्मा, घोडेस्वारी तज्ज्ञ गौरव त्रिपाठी, कोच युसुफ अली, तसेच सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना घोडेस्वारी तज्ज्ञ गौरव त्रिपाठी, कोच युसुफ अली, क्रीडा शिक्षक पूजा जैन, विपिन सर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*