राज्यभर उष्णतेची लाट ; मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक चटका

नाशिक, महाबळेश्वला किमान तापमानामुळे दिलासा

0

नाशिक : राज्यांतील विदर्भ व मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने उष्णतेची लाट पसरली आहे. होळीनंतर राज्यात बहुतांशी भागात पारा वर जात असल्याचे मानले जात असले तरी प्रत्यक्षात या अगोदर तापमान वाढ झाल्याने अंगाला चटके बसू लागले आहे. अनेक शहरे तापमानामुळे तापली जात असताना मात्र नाशिक व महाबळेश्वर याठिकाणी किमान तापमान 12 ते 16 दरम्यान असल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळत आहे.

गत वर्षात राज्यात दोन वर्षांनंतर समाधानकारक पाऊस झाला असून अनेक जिल्ह्यातील पाणीप्रश्न मिटले आहे. तर विदर्भ व मराठवाडा भागात झालेल्या पावसामुळे मोठा प्रश्न मिटला असून अनेक वर्षे न भरलेली धरणे व प्रकल्प भरले गेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा येणार्‍या उन्हाळ्यात पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार नसल्या, तरी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट राज्यात आली आहे.

राज्यात साधारण एप्रिल व मे महिन्यात पार्‍यांचा उच्चांक होत असतो. यावेळी विदर्भ व मराठवाडा या भागात दिवसा बाहेर फिरणे अवघड होऊन जाते. आता मात्र एक महिना अगोदर म्हणजे मार्च महिन्यातच पारा अचानक वर गेल्याने राज्यातील प्रमुख शहरे तापू लागली आहे. त्याचे परिणाम प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात जाणवू लागले असून 4 मार्च 2017 रोजी अकोला याठिकाणी 37.9 असे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. यावरून मे महिन्यात मराठवाड्यात 42 ते 45 अंशापर्यंत असणारे तापमान अधिक वाढणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

तसेच 4 मार्च 2017 रोजी राज्यात सर्वाधिक किमान तापमान 12.4 अंश असे नाशिकला नोंदविले गेले. राज्यात पारा वर सरकत असताना मात्र नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात किमान तापमान 12 ते 16 अंशांच्या दरम्यान राहत असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळत असून हेच चित्र महाबळेश्वरला बघालया मिळत आहे. एकूणच नाशिक व महाबळेश्वरचे कमाल व किमान तापमान सारखे राहत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील अनेक शहरात पारा वर सरकल्याने जमीन तापली असून उन्हाच्या झळामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे जाणवू लागले आहे. साधारण एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट येत असताना आता हे चित्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिसू लागले आहे. त्यामुळे आज पारा वर सरकत असल्याने पुढील दोन महिन्यांत यापेक्षा तापमान अजून वर सरकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात 38 अंश सेल्सीअस इतके नोंदवले गेले आहे.

नागपूर, नांदेड व सोलापूर याठिकाणी 37, अकोला 36, जळगांव, अहमदनगर, सातारा, गोदिंया व अमरावती 35, बुलढाणा, औरंगाबाद व पुणे 34, नाशिक 33 अंश असे तापमान राज्यात आज नोंदविले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगांव व अहमदनगर याठिकाणी किमान तापमान हे काही दिवसापासून 12 ते 14 अंशापर्यंत असून विदर्भ व मराठवाड्यात किमान तापमान 18 ते 20 अंशापर्यंत गेले आहे.

LEAVE A REPLY

*