राज्यपालांच्या हस्ते 21 जणांचा गौरव

0

धुळे /जिल्ह्यातील जि.प. शाळा 100 टक्के डिजीटल झाल्याबद्दल 21 जणांचा राज्यपालांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ठाणे येथे हा कार्यक्रम झाला. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे व राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक यांनी रात्र प्रेरणासभेचे आयोजन करुन लोकसहभागासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.

या कार्यासाठी हर्षल विभांडीक व देशबंधू व मंजु गुप्ता फाऊंडेशन यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

राज्यात 100 टक्के डिजीटल शाळांमध्ये अव्वल ठरणार्‍या जिल्ह्याने लोकसहभागातून डिजीटल शाळा उभारल्यामुळे इंग्लिश मिडीयमची मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येत आहे, ही खुप अभिमानाची बाब असल्याचे नमुद केले.

राज्यात सर्वप्रथम डिजीटल झालेला धुळे जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशातही प्रथम असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*