क्रेनच्या मदतीने घोडा गडावर

0

अहमदनगर- शहरातील नेप्ती नाका परिसरातील नवग्रह मित्र मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची रणनिती हा देखावा सादर केला आहे. त्यासाठी 30 फूट उंचीचा गड तयार केला आहे.

गडावर घोड्याची प्रतिकृती ठेवण्यात आली असून गडावर घोडा पोहचविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात असा भव्य देखावा बहुधा पहिल्यादांच होत असावा.

शहर परिसरात त्याची चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत देखावा खुला केला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अमोल बनकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*