Type to search

क्रीडा

राजस्थानला 176 धावांचे आव्हान

Share
कोलकाता। कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, घरच्या मैदानावर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने 175 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा स्टिव्ह स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने आपली चमक दाखवत कोलकात्याच्या सलामीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडलं.

ख्रिस लिन आणि शुभमन गिल हे कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर या सामन्यात अरॉनचे बळी ठरले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद 97 धावा केल्या.

मात्र दुसर्‍या बाजूने कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानच्या गोलंदाजीचा नेटाने समाचार करत आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरच्या षटकांत दिनेशने कोलकात्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राजस्थानकडून वरुण अरॉन अष्टपैलू चमक दाखवली. त्याने दोन बळींसोबत एक झेल आणि धावबादही केला. याव्यतिरीक्त ऑशने थॉमस, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. राजस्थानला हा सामना जिंकण्यासाठी 176 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम कोलकात्याला फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकात्याच्या फलंदाजांना यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही, या गोष्टीला अपवाद ठरला तो कार्तिक. कारण कार्तिकने संघाला फक्त अडचणीतून बाहेर काढले नाही, तर संघाला आव्हानात्मक धावसंख्याही उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!