राजस्थानमधील बालेसार येथे हवाई दलाचे मिग-२३ विमान कोसळले

0

राजस्थानमधील जोधपूरजवळील बालेसार येथे हवाई दलाचे मिग-२३ हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

या दुर्घटनेविषयी अद्याप हवाई दलाने प्रतिक्रिया दिलेली नसून विमान कोसळण्याचे कारणही अजून अस्पष्ट आहे.

या दुर्घटनेची चौकशी सुरु असल्याचे समजते.

विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुप असून वेळीच विमानातून बाहेर पडल्याने दोघेही बचावले आहेत.

गेल्या आठवड्याभरात हवाई दलाला बसलेला हा दुसरा हादरा आहे.

यापूर्वी ४ जुलैरोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूम परे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

 

LEAVE A REPLY

*