राजकारण नसल्यानेच जिल्हा सहकारी बोर्ड टिकून

0
जळगाव  / जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थेला स्थापन होऊन 80 वर्ष पुर्ण होत आहे. या संस्थेत राजकारण नसल्यानेच ही संस्था टिकून असल्याचे अध्यक्ष बापुराव देशमुख यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.
दरम्यान दि. 10 जून रोजी 81 वा वर्धापन दिन असुन त्यानिमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा सहकारी बोर्डाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परीषदेत अध्यक्ष बापूराव देशमुख यांनी सांगितले की, दि. 10 जून 1937 मध्ये म्हणजेच ब्रिटीशांच्या काळात या संस्थेची स्थापना झाली आहे.

सन 1948 पर्यंत या संस्थेवर शासकीय अधिकार्‍याची नियुक्ती होती. त्यानंतर मात्र वामनराव सावंत यांची सहकारी बोर्डाचे पहीले अध्यक्ष म्हणून निवड झाली.

तेव्हापासून या संस्थेने आपली प्रगती स्वबळावर सुरू केली. ही संस्था सहकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांची अन् अधिकार्‍यांची शाळा असल्याचे बापूराव देशमुख यांनी सांगितले.

या बोर्डाला दि. 10 जून रोजी 80 वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर कृऊबासचे अध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी महावीर बँकेचे अध्यक्ष दलीचंद जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी साहित्यीक ज्ञानेश मोरे हे उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष बापूराव देशमुख यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परीषदेस संचालक सुदाम पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*