राजकारणातील प्रवेशाबद्दल निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करेन : रजनीकांत

0

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत राजकारणात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे.

याच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील प्रवेशाबद्दल निर्णय घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती रजनीकांत यांनी दिली.

मात्र या बैठकीच्या स्वरुपाविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

‘मी काही राजकीय नेत्यांसोबत चर्चा केली. राजकीय नेत्यांना भेटल्याचे मी नाकारत नाही. आम्ही चर्चा करत आहोत आणि याबद्दल निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात येईल,’ असे रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले.

आठवड्याच्या सुरुवातीला रजनीकांत यांनी हिंदू मक्कल कातची संघटनेच्या सदस्यांची निवासस्थानी भेट घेतली होती.

त्यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*