राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करणारा गजाआड

0

दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ‘शार्प शूटर’ उस्मान खानला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय.

जॉन उस्मान उर्फ उस्मान खान (३५) असे या शार्पशूटरचे नाव आहे.

पूर्व दिल्लीतील संजय तलाव परिसरातून उस्मान खानला गुरुवारी अटक करण्यात आलं.

पोलिसांनी त्याला पत्नीवर गोळी झाडल्याप्रकरणी अटक केली होती. खानने विकासपुरी परिसरात ३ जून रोजी आपल्या पत्नीवर गोळी झाडली होती. तो आपल्या एका साथीदाराला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. ही माहिती मिळताच स्पेशल स्टाफचे पोलीस निरीक्षक विनय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण संधू, के. के. शर्मा आणि एएसआय सुदेश पाल यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सापळा रचून उस्मानला बेड्या ठोकल्या.

उस्मानला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली.

या चौकशीत त्याने पोलिसांना दलेर मेहंदी, राकेश रोशन, अनिल थडानी यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगितले. १९९६ साली ‘मुंबईत आल्यानंतर मी गुलशन कुमार यांच्या हत्येत सामील असलेल्या वसिमला भेटलो. वसिमने माझी भेट अबू सालेमशी करून दिली.

सालेमने बनावट नोटांचा धंदा करणाऱ्या आफताबशीदेखील माझी भेट करून दिली. त्यानंतर आफताबसोबत मी दुबईहून कराचीमार्गे तसेच नेपाळ आणि बांग्लादेशहूनही बनावट नोटांचा धंदा केला,’ अशी माहिती उस्मानने पोलिसांना दिली.

LEAVE A REPLY

*