Type to search

जळगाव

रस्त्यांच्या विकासामुळे जनसामान्यांचे जीवन सुकर!

Share

जळगाव | रस्ते मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले रस्ते हे फक्त दळणवळणासाठी नाही तर जनतेचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

तालुक्यातील रस्त्यांचे व विविध गावांतर्गत विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी,उपसभापती सुरेश पाटील,पं. स.सभापती यमुना पाटील,जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, लालचंद पाटील, प्रतापराव पाटील , धरणगाव पं. स. सभापतीपती अनिल पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, प्रमोद सोनवणे, बाळाशेठ ,डॉ कमलाकर पाटील, पं.स.सदस्य हर्षल चौधरी, मुकुंदराव ननावरे,जर्नादन पाटील, प्रेमराज पाटील, संजय घुगे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता जितेंद्र सोनवणे, सा.बा.विभागाचे शाखाअभियंता आर.व्ही.पाटील, कृऊबा संचालक वसंत भालेराव,अनिल भोळे, दामू पाटील, समाधान चिंचोरे, सरपंच वत्सलाबाई मोरे, प्रियंका पाटील, शालिनी भंगाळे, छगन पाटील,प्रभाकर सोनवणे, गणेश पाटील, पंकज पाटील, रमेश पाटील, सुधाकर सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी, भरत बोरसे यांच्यासह आव्हाणे, भादली,भोकर,पळसोद, जामोद व आमोदा या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य,विका सोसा चेअरमन, संचालक शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेले आव्हाणे फाटा त आव्हाणे १.७५ किमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे १ कोटी ३८ लाख, पळसोद ते रामेश्वर ३ किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे २ कोटी ५६ लाख, बेळी ते निमगाव १.५ किमी या रस्त्याचे डांबरीकरण करणे ९९ लाख ५४ हजार, हायवे ते टिघ्रे १.१७ किमी रस्त्याचे मजबुतीकरण करणे ६५ लाख ३७ हजार तसेच शासनाच्या बजेट मधून भादली ते गाढोदा ५ किमी रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ५० लाख, आव्हाणे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे ३५ लाख,निमगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे आणि जामोद, आव्हाणे, पळसोद, बेळी, भादली खु,भोकर व आमोदे या गावांमधील गावं अंतर्गत कॉंक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृह बांधकाम व इतर कामांचे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.आव्हाणे येथे १४ व्या वित्तायोगातून जि.प. शाळेला ४२ इंची टीव्ही संचाचे वाटपही करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यमंत्री ग्रामसडक चे शाखा अभियंता जितेंद्र सोनवणे व शाखा यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संदीप पाटील यांनी केले तर आभार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!