Type to search

नंदुरबार

रस्ते, रोजगार, सिंचनावर नियोजनबद्ध काम करणार : पाडवी

Share

मोदलपाडा । वार्ताहर – मी शासकीय नोकरीचा राजीनामा देत मायभुमीच्या सेवेसाठी आलो आहे. जनतेच्या आग्रहास्तव मला उमेदवारी मिळाली आहे. प्रशासकीय सेेवेचा अनुभव पणाला लावता मी मतदार संघात विकास खेचून आणेल. रस्ते, रोजगार, सिंचन यावर मी अतिशय नियोजनबध्दपणे काम करणार आहे, असा विश्वास भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी यांनी व्यक्त केला.

श्री.पाडवी म्हणाले, मी मुंबई येथील पोलीस दलात नोकरीत असतानाच समाजकारणाला सुरूवात केली होती. या माध्यमातून गरीबांना मदत करणे, विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी त्यांना येणार्‍या अडचणी सोडविणे, प्रसंगी मुंबईला आरोग्याची सुविधा मिळवून देणे, तेथे रूग्णांची व्यवस्था करणे आदी कामांत प्रसिध्दीचा कुठलाही हव्यास न ठेवता स्वतःला झोकून दिले होते. त्यातूनच मतदार संघातील जनतेच्या मनात स्थान मिळविले. त्यांच्या या कामाचे फलित म्हणून मित्र परिवाराच्या माध्यमातून त्यांना लोकसेवेचा आग्रह झाला अन् निवडणूक रिंगणात उतरलो.

मी नवखा असल्याबाबत सुरूवातीला विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. माझी मायभुमी हा मतदारसंघ आहे. इथल्या जनतेच्या समस्या पाहतच मी लहानाचा मोठा झालो आहे. विकास काय असतो, हे पुढारलेल्या तालुक्यात पाहिले, तेव्हा आपला तालुकाच मागे का? हा विचार सतत माझ्या मनात येत होता. त्यातूनच आपल्या मायभुमीसाठी काम करावे, या उद्देशाने समाजकारणाकडे वळलो. मुंबईत सेवेला होतो तरी मी सतत लक्ष्य कलावती फाउंडेशन माध्यमातून सामाजिक सेवेकडे असायचे. त्या माध्यमातून अडलेल्या गरीबांना मदतीचा हात पुढे करत प्रसंगी मुंबईत त्यांची आरोग्यविषयक सेवेत मदत केले.

माझ्या मतदार संघात तालुक्यातील जनतेच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. आदिवासीबहुल जनतेसाठी नेमके काय हवे आहे, रोजगार, सिंचन आणि कृषीमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग, रस्त्यांसह पायाभूत सुविधा, घरोघरी वीज आदी मुद्दे घेवून प्रतिनिधीत्व करणार आहे. केवळ निवडणूक म्हणून आश्वासन देत नाही तर प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जावून त्याची तपशीलवार मांडणी करीत ते शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न करेल. प्रशासकीय सेवेचा अनुभव पणाला लावत प्रत्येक प्रकरण हाताळणार आहे. विशेष म्हणजे जनतेला सदैव उपलब्ध असणार आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा- शिवसेना युतीच्या काळात सुरू झालेली विकासाची गंगा अखंडपणे प्रवाहीत ठेवत तालुका सुजलाम सुफलाम करण्याला माझे प्राधान्य असेल. हे करताना मी मतदार संघातील सर्व ज्येष्ठांचे सहकार्य घेईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत विकासाच्या योजना तळागाळापर्यंत नेईल. प्रशासनाकडून होणारी जनतेची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!