रस्तालूट करणार्‍या टोळीतील सारसनगरच्या तिघांना अटक

0

सिनेस्टाईलने पाठलाग

बाजार समिती चौकातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील नेवासकर पेट्रोल पंपाच्या समोर एका प्रवाशास लुटत असताना रात्र घालणार्‍या पोलिसांनी तिघांना सिने स्टाईलने पाठगला करत बेड्या ठोकल्या आहे. या तिघांकडून रोख आठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास घडली.
सचिन विश्‍वनाथ तांबे, गणेश म्हसुदेव पोटे, संतोष भाऊसाहेब गाडे (सर्व. रा. सारसनगर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
संदीप विलास क्षीरसागर (रा. बेडवाडी, ता. दौण्ड) हे ट्रक घेऊन पुण्याकडे जात होते. शुक्रवारी पहाटे नेवासकर पेट्रोलपंपाच्या समोर ‘विधी’साठी ते थांबले असता त्यांना आरोपींनी दमदाटी सुरू केली. ‘येथे कशाला थांबला’ असे म्हणून त्याला मारहाण केली. क्षीरसागर यांच्या खिशातील 1 हजार रुपये व ट्रकमधील दोन मोबाईल असा आठ हजारांचा मुद्देमाल लुटला. घडलेला प्रकार कोणाला सांगशील तर ठर मारू अशी धमकी जाताना क्षीरसागर याला दिली. हा प्रकार सुरू असताना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकम रात्र गस्त घालत होते. त्यांनी हा प्रकार पाहिला असता तिघांच्या दमदाटी करण्याचा जाब त्यांनी विचारला. पोलिसांना पाहुन आरोपींची पळापळ झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांचा पाठलाग करत तिघांना अटक केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील अधिक तपास करीत आहेत. दुपारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*