रशियन कलावंतांनी लुटला नांदुरमध्यमेश्वरच्या बर्ड सफारीचा आनंद

0

नाशिक, ता. २ :

‘नेचर क्लब ऑफ नाशिक’तर्फे महाराष्ट्रातील भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात बर्ड समर सफारी पक्षी निरीक्षण सहल आयोजित करण्यात आली होती.

नेचर क्लब ऑफ नाशिक ने प्रथमच या ठिकाणी बर्ड समर सफारी चे आयोजन केले होते. भर उन्हात पक्षी निरीक्षण करताना अनेक पक्षी जवळून बघावयास मिळाले.

धरणात पाणी नसल्याने थेट आत पायी चालत जाऊन पक्षी बघता येत आहेत.

पहिल्या सफरीत नाशिक मध्ये आलेल्या सर्कस मधील रशियन कलावंतांनी या सफारी मध्ये सहभागी होवून पक्ष्यांचे मनसोक्त निरीक्षण केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा यांनी पर्यटकांना माहिती दिली तर अभयारण्याचे गाईड अमोल जाधव, गंगाधर आढाव, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे आदींनी पक्ष्यांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, अभिषेक रहाळकर, धनंजय बागड, आदींसह निसर्गप्रेमी उपस्थित होते

निफाडला चाळीस डिग्री पर्यंत तापमान असतानाही या अभयारण्यात तब्बल पाच हजार पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास मिळत आहे.

तसेच धरणात पाणी संपत आले असतानाही या वर्षी मोठ्या संख्येने पक्षी येथे खाद्य शोधण्यासाठी आले आहेत.

पेंटेड स्टोर्क, उघड्या चोचीचा करकोचा, शराटी, शावलर, विजन, गडवाल, जाकाना, गारगर्नी, ब्राह्मणी डक, ग्रे हेरॉन आदी सह ग्रास लँड बर्ड देखील बघावयास मिळत आहे. तसेच सायंकाळी रान डुक्कर, बिबट्या, कोल्हे, रान मांजर यासारखे प्राणी पाहण्याचीही संधी पर्यटकांना मिळते.

LEAVE A REPLY

*