‘रन ऍण्ड वॉक’ स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगाव | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त दै.देशदूत, जळगाव रर्नस गृप, सुशिल द वुमन्स शॉपी, रेडीओ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८ रोजी सकाळी ६.३० वाजता ‘रन ऍण्ड वॉक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

सागरपार्क येथून ‘रन ऍण्ड वॉक’ स्पर्धेला सुरुवात होवून काव्यरत्नावली चौक, महाबळ मार्गे सागरपार्कवर या स्पर्धची सांगता होईल. ही स्पर्धा वयोगट १८ ते २५, २६ ते ३५ व ३६ वर्षाच्या पुढे या तीन गटात होणार आहे. तीन गटांसाठी प्रत्येकी तीन बक्षिसे दिली जाणार आहे.

प्रथम क्रमांकासाठी १५०० रुपयाचे गिफ्ट व्हाऊचर, सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार रुपयाचे गिफ्ट व्हाऊचर, सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपयाचे गिफ्ट व्हाऊचर व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी सपना काबरा (९४२२७७१००६), डॉ.सिमरन जुनेजा (९८९०९६३४००), प्रेमलता सिंग (९३७३०६२५५५), डॉ.तृप्ती बढे (९४२३९७४८८६), डॉ.दर्शना शहा (२२३३८९३) यांच्याशी संपर्क साधावा.

वयोवृध्द व दिव्यांगाचाही सन्मान होणार

रन ऍण्ड वॉक स्पर्धेत सहभागी होणार्‍या वयोवृध्द व दिव्यांग स्पर्धकांचाही आयोजकांच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*