रणबीरसाठी आईने पाहिली लंडनची मुलगी

0

संजय दत्तच्या बायोपिकला एकीकडे रणबीर कपूर घेऊन व्यस्त आहे. तर, दुसरीकडे त्याची आई नीतू कपूर त्याच्यासाठी मुलगी शोधत आहे. याबाबत एका संकेतस्थळाने दावा केला आहे की, लंडनच्या एक नामी परिवाराच्या मुलीशी रणबीरच्या लग्नाची बोलणी सुरु आहे. ज्यामुळे रणबीर अरेंज मॅरिज करु शकतो.

संकेतस्थळाच्यानुसार मुलीच्या परिवाराशी भेटायला आई नीतू कपूर लंडनला पण गेल्या होत्या. नीतू कपूर यांना मुलगी पसंत पडली असून रणबीरची काळजी घेणारी मुलगी नीतू कपूर यांना पाहिजे आहे. ज्या मुलीला रणबीरसाठी नीतू यांनी बघितले आहे ती त्यांच्या हिशोबाने एकदम बरोबर आहे. तरी आतापर्यंत नीतू आणि रणबीर कोणीही याविषयी बोलले नाही.

LEAVE A REPLY

*