रजनीकांत यांच्या ‘काला करिकालन’चित्रपटाचे मुंबईत शूटींग सुरु

0

सुपरस्टार रजनीकांत यांच्या  ‘काला करिकालन’ या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे.

मुंबईत ‘काला करिकालन’च्या शूटींगचे पहिले शेड्यूल पार पडणार आहे आणि याच शूटींगसाठी रजनीकांत मुंबईत दाखल झाला आहे.

मुंबईतील वडाला येथे रजनीकांत शूटींगसाठी पोहोचला आणि चाहत्यांची एकच गर्दी जमली.

शेकडो चाहत्यांनी रजनीकांला गराडा घातला. रजनीकांतनेही चाहत्यांचे स्वागत मनापासून स्वीकारत त्यांना हात दाखवून अभिवादन केले.

तूर्तास रजनीकांत या चित्रपटासह ‘2.0’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटात  हुमा कुरेशी, नाना पाटेकर यांच्याशिवाय ईश्वरी राव, अंजली पाटील, संपथ, रवि काळे, सयाजी शिंदे, पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मुंबईत काही सीन्स शूट केल्यानंतर या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण चेन्नईत होणार आहे. चेन्नईत यासाठी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीचा सेट तयार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*