रजनीकांत यांची मुलगी अडकली लग्नबंधनात, चेन्नईत पार पडला सोहळा

0
चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपंल वेगळं विश्व प्रस्थापित करणाऱ्या सुपरस्टार आणि ‘थलैवा’ म्हणून नावलौकिक असणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांच्या मुलीचा म्हणजेत सौंदर्या रजनीकांत हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. तमिळनाडूतील चेन्नईमध्ये असणाऱ्या हॉटेल लीला पॅलेस येथे सौंदर्या आणि अभिनेता, व्यावसायिक विशगन वनानगामुडी यांनी लग्नगाठ बांधली.

काही दिवसांपूर्वीच सौंदर्या आणि विशिगनचे प्रिवेडींग सेलिब्रेशन झाले. या सोहळ्याचेही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मेहंदीच्या कार्यक्रमात सौंदर्या भावूक झालेली दिसली. रजनीकांत सोबतचा तिच्या एका फोटोला चाहत्यांनी भरभरून लाईक केले आहे. चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या विविध कार्यक्रम, विधी आणि समारंभानंतर अखेर सौंदर्या आणि विशगन यांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचनं घेतली.

पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात खुद्द रजनीकांत, त्यांचा जावई अभिनेता धनुष यांनी पाहुण्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. राजकारण, कलाविश्व आणि व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील काही बड्या प्रस्थांनीसुद्धा या विवाहसोहळ्याला हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. ज्यामध्ये अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले कमल हसन, दिवंगत द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांच्या दोन्ही मुलांचा समावेश होता.

सौंदर्याचे हे दुसरे लग्न….

२०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते. सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले होते. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. त्यांना ५ वर्षाचा मुलगाही आहे. मागच्या वर्षीच दोघांनीही घटस्फोट घेतला.

LEAVE A REPLY

*