Type to search

आरोग्यदूत

रक्तवाहिन्यांचा विकार

Share
वेगवेगळे छेद
1) छातीच्या मध्यभागी उभा छेद हा सगळ्यात सर्वसामान्य छेद आहे. बहुतेक शस्त्रक्रिया या छेदातूनच केल्या जातात.
2) आडवे छेद – डाव्या किंवा उजव्या बाजूला छोट्या प्रमाणात आडवे छेद घेऊन मर्यादित स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होतात. दुसर्‍या वेळी शस्त्रक्रियेसाठी याचा वापर केला जातो. याचा फायदा जास्त कॉस्मोसिससाठी आहे. कारण हे छेद कपड्याखाली झाकडे जातात व सहज दिसून येत नाहीत.

रक्त वाहिन्यांचा वापर
1) पायाची शीर- हिला सॅफेनस व्हेन असे म्हणतात. ही अशुद्ध रक्तवाहिनी आहे. तिचा बायपास करण्यासाठी अजूनही बर्‍याच प्रमाणात वापर होतो. पायावर छेद घेऊन ही शीर काढली जाते. ही शीर बायपास म्हणून वापरल्यानंतर टिकण्याचे प्रमाण म्हणजेच अरुंद होण्याचे प्रमाण जास्त आढळून आले. साधारणपणे 7 ते 8 वर्षांत जवळजवळ 30-35 टक्के रुग्णात या रक्तवाहिन्या अरुंद किंवा बंद होतात. याची कारणे अनेक आहेत व त्यामुळे रुग्णाला पूर्णवत त्रास होऊ शकतो. यामुळे याचा वापर आता कमी होऊ लागला आहे.

2) हाताची शीर – उजव्या किंवा डाव्या हातात मनगटाजवळ छेद घेऊन ही शुद्ध रक्तवाहिनी काढली जाते. या शिरेचे टिकण्याचे प्रमाण पायाखाली शिरेपेक्षा चांगले आहे असे आढळले आहे.

3) छातीच्या आतमधील रक्तवाहिन्या – याला Internal mammary artery (IMA)Internal mammary artery (IMA) असे म्हणतात डावी लिमा व उजवी रिमा. डाव्या शिरेचा वापर बर्‍याच वर्षापासून होतो आहे. जवळजवळ मुख्य नसेला पुढच्या भागाला रक्तपुरवठा करणारी (Left anterior descending antery) ला लीमा ही नस प्रामुख्याने जोडली जाते. उजवी शिर ही आता जास्त प्रमाणात वापरली जाऊ लागली आहे. या दोन नसांचा वापर केल्यास हातापायांवरील छेद टळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिकाऊपणा – 10 वर्षांत फक्त 10 ते 15 टक्के रुग्णामध्येच अरुंदीकरण होंण्याचे प्रमाण आढळून आले आहे. आज 80 टक्क्यापेक्षा जास्त रुग्णात या नसाचा वापर केला जातो. फक्त 65 वर्षांपुढे एक म्हणजे लिमा व दुसरी पायाची नस वापरली जाते. कारण हाडांचा रक्तपुरवठा व जखम भरून येण्यास कधी कधी जास्त वेळ लागतो किंवा इन्फेक्शन होण्याचा संभव त्यांच्यात वाढतो.

4) पोटांमधील रक्तवाहिन्या जठराला रक्तपुरवठा करणारी (Gastroepiplic artery) तसेच पोटामधील inferior epigastric antery या शिराही काही सर्जन वापरतात पण या फार प्रचलित नाहीत. या सर्वांमध्ये छातीच्या आतमधील रक्तवाहिन्या निला+रिमा अत्युच्चतम व त्या पाठोपाठ हातातील शिरेचा नंबर लागतो.
डॉ. मनोज चोपडा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!