रक्तदानाची रॅलीद्वारे जनजागृती

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-समाजात रक्तदानविषयी जनजागृती व्हावी यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई व रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यामाने 14 जून जागतिक रक्तदाता दिवस व सप्ताहनिमीत्त रॅली काढण्यात आली.
दरम्यान रॅलीतून फलकांद्वारे रक्तदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात रॅलीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे, डॉ. अजरुन सुतार, संजय पहूरकर उपस्थित होते.

रॅलीत नुतन मराठा महाविद्यालय व जिल्हा सामान्य परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान त्यांनी तुम्ही काय करु शकता रक्तदान करा.

आत्ताच करा नेहमी करा हे घोषवाक्य असलेल्या फलकांतून शहरात रक्तदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी रक्तदान करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रॅलीस डॉ. किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

15 रक्तदात्यांनी केले रक्तदान
जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त जिल्हा सामान्य रुग्णालयातून काढण्यात आलेल्या रॅलीनंतर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान रक्तदाना विषयी जनजागृती केली.

असा होता रॅलीचा मार्ग
जिल्हा सामान्य रुग्णालयातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानपंतर रॅली पुष्पलता बेंडाळे चौक, चित्रा चौक, गणपती मंदिर, नवीपेठ, नेहरु चौक, कोर्ट चौक, स्टेडियम चौकातून, आर. आर. विद्यालय, जिल्हासामान्य रुग्णालयाच्या मागील बाजूने जिल्हा सामान्य रुग्णालयात रॅलीची सांगता करण्यात आली.

 

 

LEAVE A REPLY

*