रंग फेकण्यासाठी वाकल्याने तोल जावून पडल्याने जळगावला व्यापार्‍याचा मृत्यू

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील सिंधी कॉलनी धुलिवंदनदरम्यान घराच्या गॅलेरीतून रंग फेकण्यासाठी वाकलेल्या व्यापार्‍याचा तोल जावून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.१३ रोजी दुपारी घडली.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की,  फुले मार्केटमधील नवशक्ती गारमेन्टचे मालक शामलाल परमानंद आहुजा वय ४२ हे त्यांच्या कुटुंबियांसोबत धुलिवंदनाचा सण साजरा करीत असतांना त्यांच्या घराजवळील खालच्या मजल्यावर काही मुली लपल्या  होत्या.

घराच्या गॅलेरीतून त्यांच्या अंगावर रंग फेकण्यासाठी शामलाल आहुजा खाली वाकले असता, त्यांचा तोल गेल्याने ते जमीनवर पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील रहिवाशी अशोक मंधान,टिकमदास तेजवाणी, महेंद्र कुकरेजा यांनी आहुजा यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

त्या ठिकाणी त्यांची तपसाणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडीलांच्या निधनानंतर मुलगा व मुलीने दिली परिक्षा

शामलाल आहुजा यांची मुलगा आशिष इयत्ता १२ वी तर मुलगी निकीता १० वीत आहे. निकिता दि.१४ रोजी गणिताचा पेपर असल्याने वडीलांच्या निधनानंतरही मुलगी निकीता हिने वडीलाचे अंतिम दर्शन घेवून पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुपारी १ वाजता शामलाल आहुजा यांच्यावर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*