रंगांनी सजली बाजारपेठ

0

जळगाव |  प्रतिनिधी :  होळी व धुलिवंदन हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. हा सण साजरा करण्यासाठी पिचकारी, विविध प्रकारचे रंग यासह हार कंगणाची बाजारपेठेत दुकाने थाटली आली आहे. दरम्यान यंदा रंगांच्या भावात १० टक्क्यांनी भाववाढ झाली आहे. होळीला लागणार्‍या वस्तुंची खरेदी करण्यासाठी ग्राहाकांची बाजारपेठेत गर्दी केली होती.

होळी व धुलिवंदन हे सण दोन दिवसांवर  येवून ठेपला आहे. दरम्यान हे सण लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच स्तरात हा सण अतिशय उत्साहात पुर्ण वातावरणात साजरा केला जात असतो. बाजारपेठेसह विविध ठिकाणी  हारकंगण, वेगवेगळ्या आकाराच्या पिचकारी यासह  विविध प्रकारच्या रंगांची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी बाजारपेठेत दुकाने थाटली आहे.

तसेच लहानमुलांसाठी कार्टुन, पाईप, टँकर यासह अनेक प्रकारच्या पिचकार्‍या तसेच यंदा ग्राहकांकडून पर्यावरण पुरक असलेल्या इको कलरची खरेदी केली जात आहे. त्याचप्रमाणे होळीच्या पुजेला लागणार्‍या हार कंगणाची दुकाने बाजापेठेत लागली आहे. मात्र यंदा साखरेचे भाव वाढल्याने हार कंगणांच्या किमतीमध्ये सुमारे ३० भाव वाढ झाली आहे.

कार्टुनच्या पिचकार्‍यांना मागणी

धुलिवंदन लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत साजरी केली जात असते. दरम्यान पाणी उडविण्यासाठी लहान मुलांसाठी छोटाभिम, डोरेमॉन, मोटु पतलू, स्पायडर मॅन, बंदूक, टँकर, इंडियन पाईप, कासव यासह विविध प्रकारच्या लहान मोठ्या पिचकार्‍यांची  २० रुपया पासून ते ४०० रुपयांपर्यंतच्या पिचकार्‍या बाजारपेठेत दाखल झाल्या आहे.

हार कंगणच्या भावात वाढ

होळीच्या सणाला हार कंगणाला विशेष महत्व असून त्याची होळीच्या सणाला त्याची खरेदी केली जात असते. मात्र हार कंगण बनविण्याच्या कच्चामालात व मजुरीत वाढ झाल्याने यंदा हार कंगणाचे भाव ३० टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान या भाव वाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे.

इको फें्रडली रंगांना पसंती

केमिकल मिश्रीत रंगांमुळे आजारी व त्वचे आजार होण्याचा संभव असल्याने नागरीकांकडून कोरडे रंग लावून धुलिवंदन साजरे केले जात असते. तसेच यंदा सर्वत्र नागरीकांकडून लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी, गुलाबी या इको फें्रडली कलर्सना अधिक पसंती दिली जात असून १० रुपयांच्या पुडी पासून ते २०० रुपये किलो प्रमाणे या इको फें्रडली रंगाची खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

*