योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून अपात्र; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

0

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पदासाठी अपात्र आहेत, अशी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली आहे.

याबाबत महाधिवक्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती वीरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. संजय शर्मा या व्यक्तीने ही जनहित याचिका दाखल केली आहे.

खासदार हा कोणत्याही राज्याचा मंत्री होऊ शकत नाही. संविधानातील 10(2) या कलमाचं हे उल्लंघन आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांना अपात्र ठरवण्यात यावे. कारण दोघेही सध्या खासदार आहेत, असे याचिकेत म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

*