ये तो झाकी है, मुंबईका मोर्चा अभी बाकी है…!; सकल मराठा समाज बांधवांची दुचाकी रॅली

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीदिनी (9 ऑगस्ट) मुंबईत होणार्‍या विराट मूक मोर्चाच्या तयारीसाठी अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी नगर शहरात अभूतपूर्व अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास माळीवाडा येथून रॅलीला सुरूवात झाली. हजारो तरूण, तरूणी, सकल मराठा समाजाचे हजारो बांधव रॅलीत सहभागी झाले. ‘ये तो अभी झाकी है….’ ‘मुंबई का मोर्चा अभी बाकी है, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी शहर दणाणून गेले. महापौर सुरेखा कदम याही दुचाकी रॅलीत सहभागी झाल्या. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हजारो युवक आणि सकल मराठा बांधव एकत्र आले. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुचाकी रॅली माळीवाडा वेशीजवळ येवून थांबली. तेथून आडेअकरा वाजता रॅलीला सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी तरूणी, महिला त्यांच्या पाठोपाठ तरूण आणि सकल मराठा समाज बांधव यांनी दुचाकीची दुहेरी रांग करत रॅली काढली. वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्रपणे स्वयंसेवक नेमण्यात आले होते.
रॅलीचे माळीवाडा वेस येथे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी फटकेवाजून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष करत रॅली मार्गस्थ झाली. पंचपीर चावडी, आशा टॉकीज, कोतवाली पोलीस चौकी, भिंगारवाला चैक, एम.जी.रोड, तेलीखूंट, नेता सुभाष चैक, चितळेरोड, चैपाटी कारंजा, दिल्लीगेट मार्गे, निलक्रांती चौक, न्यू आर्टस कॉलेज रोड, लालटाकी, पत्रकार चौक, झोपडी कॅन्टींग, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, श्रीराम चौक, गुलमोहर रोड पोलीस चौक, महाराजा हॉटेल मार्ग, औरंगाबाद रोड, एस.पी.ऑफीस चौक, कोठला चौक, स्टेट बँक चौक, चाँदनी चौक, पाटील हॉस्पिटल, कौठी मार्गे, महात्मा फुले चौक, आनंदऋषी हॉस्पिटल मार्गे चाणक्य हॉटेल, यश पॅलेस चौक मार्गे, कायनेटीक चौक येथून केडगाव येथे आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

चौका चौकात रॅलीचे स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या बांधवांनी फटक्यांच्या आतिषबाजी केली. माळीवाडा भागातून सुरू झालेल्या रॅलीत शहरातील प्रत्येक चौकात युवक आणि समाज बांधव सहभागी होत होते. भिस्तबाग परिसरात रॅली पोहचल्यानंतर त्या ठिकाणी एमआयडीसी, सावेडीगाव, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, बोल्हेगाव, नागापूर परिसरातील समाज बांधव आणि तरूण सहभागी झाले. त्यामुळे रॅलीचा आकार वाढला. स्टेट बँक चौकात रॅलीतील समाज बांधवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले.

सकल मराठा समाजाची रॅलीचा मार्ग शहरातून निघणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीचा मार्गावरून होती. पोलीसांनी रॅली सुरु झाल्यानंतर जागोजागी वाहतूक थांबवून ठेवली. रॅली पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. काही भागात दुपारी 12 च्या दरम्यान शाळा सुटणार असल्याने त्या ठिकाणी काही वेळ वाहतूक कोंडी झाली. 

LEAVE A REPLY

*