येथे दगड मारून होते होळी व रंगपंचमी

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक : देशातील सर्वच भागांमध्ये रंगपंचमीचा उत्साह कायम आहे. अजून पाच दिवस होळी आणि रंगपंचमीचा उत्साह कायम राहणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिकमधील काही तालुक्यात पूर्वी दगड मारून होळी साजरी केली जाई त्यास याठिकाणी ‘बार’ खेळणे असे म्हणत. तसेच राजस्थानमध्ये अजूनही अशा प्रकारची होळी साजरी केली जाते त्यास त्याठिकाणी ‘राड’ होळी म्हटले जाते.

पूर्वी नाशिकजिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात एकमेकांना दगड मारून होळी आणि रंगपंचमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाई. दगड मारून होळी आणि रंगपंचमी खेळण्याला या परिसरात बार खेळणे असे म्हटले जाई. कालानुरूप बदल घडत गेल्यामुळे आता अनोख्या प्रकारची होळी किंवा रंगपंचमी म्हणजेच बार खेळणे दुर्मिळ झाले आहे.

राजस्थानमध्ये मात्र काही गावांत अजूनही अशा प्रकारची होळी खेळतात. याठिकाणी तर शेकडो रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी दाखल होतात.

अनेकजन यादरम्यान रुग्णालयात पोहोचतात. यादरम्यान, अनेकजण दगड गोळा करून ठेवतात हा सन होलिका दहन झाल्यानंतर सुरु होतो. ढोल आणि नगाडे वाजवले जातात.

याला याठिकाणी ‘राड’ होळी म्हणतात. राड म्हणजे शत्रूता. या खेळात जो अधिक जखमी होतो तो स्वत:ला जास्त भाग्यवान समजतो. पण यामुळे अनेक जण मोठ्या प्रमाणात जखमी होतात. अशी माहिती राजस्थानमधील रहिवासी असणाऱ्या जाणकारांनी देशदूत डिजिटलशी बोलतांना दिली.

LEAVE A REPLY

*