यूपीमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

0

उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकाऱ्यांवर आज (बुधवार) प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे.

राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसहित ४ अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

मेरठ, बागपत, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद येथे हे छापे ठाकण्यात आले.

गाझियाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी विमल शर्मा यांच्या घरावरही छापे मारण्यात आले. शर्मा हे सध्या नोएडा अथॉरिटीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत

LEAVE A REPLY

*