Type to search

नंदुरबार राजकीय

युवकांना रोजगारासाठी प्रयत्न करणार:गावित

Share

नवापूर। वि.प्र. – युवकांना रोजगार, गाव तेथे रस्ता, शिक्षणाची सोयी तसेच मतदार संघातील प्रत्येक वाडयापाडयातील शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. यासाठी मला एकदा संधी द्या, असे आवाहन भाजपाचे उमेदवार भरत गावीत यांनी केले.

तालुक्यातील खांडबारा येथे भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप महायुतीचे उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचार कार्यालयाचा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार भरत गावीत, पक्ष निरीक्षक विठ्ठल चाटे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, निलेश माळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सविता जयस्वाल, जिल्हा सरचिटणीस एजाज शेख, राजेश गावीत, माजी उपसरपंच मुकूंद रामराजे, संदिप चौधरी कायर्केत व परिसरातील नागरीक उपस्थित होते. भरत गावीत पुढे म्हणाले, केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबविल्या. आपणदेखील जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना ग्रामीण भागाला विकास योजनांचा लाभ मिळावा यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. माझ्या कारकिर्दीत सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देवून सर्वाधिक विकासकामे केली. आता मतदार संघाचा सर्वांगिण करण्याचा आपला संकल्प आहे.

त्यासाठी विकासाचे व्हिजन तयार करण्यात आले आहे. विकासाचा संकल्प घेवूनच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात येवून शेतकर्‍यांच्या बांधावर पाणी कसे पोहचेल यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. केंद्र व राज्य शासन जलसंधारणाच्या कामांचा महत्व देत आहे. त्यानुसार नवापूर तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. आज ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्याची समस्या फारच गंभीर असून ती सोडविण्यास आपण प्रथम प्राधान्य देणार असल्याचे भरत गावीत यावेळी म्हणाले. यावेळी खांडबारा परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!