युद्धाचे आदेश देणाऱ्यांना सीमेवर पाठवा : सलमान खान

0
सलमान खानने बुधवारी त्याच्या ट्युबलाइट या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत युद्धाबाबत मत मांडले.
जे लोक युद्धाचा आदेश सुनावतात त्यांनाच युद्धभूमीवर पाठवायला हवे, युद्ध एका दिवसात संपेल असे तो म्हणाला. जेव्हा ते लोक सीमेवर जातील आणि हातात बंदूक घेतील त्यावेळी त्यांचे हात-पाय थर-थर कापायला लागतील, त्यानंतर थेट टेबलवर चर्चा होईल, असेही सलमान म्हणाला.
सलमानच्या ट्युबलाइट चित्रपटात भारत-चीनमध्ये झालेल्या 1962 च्या युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.
हा चित्रपट 23 जूनला रिलीज होतोय.

LEAVE A REPLY

*