यावल पं.स.मध्ये कॉंग्रेसच्या मदतीने भाजपाचा ईश्‍वरचिठ्ठीने सभापती

0

यावल |  प्रतिनिधी :  यावल पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ.संध्या किशोर महाजन (भाजपा) तर उपसभापतीपदी उमाकांत रामराव पाटील (कॉंगे्रस) यांची ईश्‍वर चिठ्ठीने निवड झाली.

यावल पं.स.मध्ये भाजपाला ५, कॉंग्रेसला ४,अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाने अपक्ष पल्लवी पुरूजीत चौधरी यांना  सभापती पदासाठी पूढे केले. मात्र ३५ वर्षापासून भाजपा संघटनेत काम करणार्‍या किशोर मधुकर महाजन दहिगाव यांच्या पत्नी सौ.संध्या किशोर महाजन यांना डावलल्याने त्यांनी कॉंग्रेसच्या ४ सदस्यांची मदत मागितली. त्यामुळे कॉंग्रेसकडे ५ सदस्य झालेत.

निवडणूक प्रक्रियेत भाजपातर्ङ्गे सौ.पल्लवी पुरूजीत चौधरी (अपक्ष  डांभूर्णी) यांना उमेदवारी दिली. त्यांचे  सुचक भाजपा गटनेते दिपक नामदेव पाटील हे सुचक झालेत. तर सौ.संध्या किशोर महाजन (दहिगाव, भाजपा) या सभापती पदासाठी रिंगणात उतरल्यात त्यांना कॉंग्रेसचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी सुचक म्हणून सही केली. त्यांनी २ नामांकन भरले. मात्र नामांकन बरोबर असल्याने एकच नामांकन छाननी व माघारीनंतर ग्राह्य धरले गेले.

दुपारी २.४५ वाजता पं.स. मध्ये  सभेसाठी भाजपा व अपक्ष  हे असे ५ सदस्य पायी आलेत. तर २.५५ मिनिटांनी कॉंग्रेसचे ४ सदस्य  व भाजपाच्या सौ.संध्या महाजन हे काचबंद गाडीत आल्यात. ही गाडी पं.स.गेट जवळ आली असता भाजपाचे कार्यकर्ते यांनी ही गाडी रोखली व गाडीतून कॉंग्रेसचे गटनेते (जि.प.) प्रभाकर सोनवणे व यावल कृउबा सभापती माजी तथा मसाका संचालक नितीन चौधरी हे खाली उतरले व पोलिसांचे मदतीने  उमेदवारांना  गाडीतून उतरून पं.स.मध्ये पाठविले.

या ठिकाणी नेमकी गाडी बंद पडली. व कार्यकर्त्यांमध्ये राडा चालू असतांना पोलिसांसह, होमगार्ड यांनी ही गाडी लोटून नेली. यावेळी पीआय बहिराम हिरे,  एपीआय योगेश तांदळे यांच्यासह पोलिस स्टॉपने वेळीच बंदोबस्त केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पं.स. सभागृहात सभापती-उपसभापतीचे निवडीचे कामकाज सुरू झाले तेव्हा निवडीचे प्रसंगी पिठासीन अधिकारी यांनी  नामांकनाबाबत अर्ज वाचन केले. यावेळी  भाजपा गटनेते दिपक पाटील (पं.स.यावल) यांनी सौ.संध्या किशोर महाजन यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली.

त्याचा लेखी  खुलासा  संध्या महाजन यांनी केला.त्यावर दिपक पाटील यांनी घेतलेली हरकतत पिठासीन अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे यांनी ङ्गेटाळून लावली. तर हातवर करून मतदान  घेण्यात आले. त्यात  भाजपातर्ङ्गे अपक्ष सौ.पल्लवी चौधरी व कॉंग्रेसच्या पाठींब्यावरील भाजपाच्याच उमेदवार सौ.संध्या महाजन यांना प्रत्येकी पाच मते हातवर करून मिळाल्याने दैवी चिठ्ठी (ईश्‍वर चिठ्ठी) करढण्यात आली.

त्यात सौ.संध्या किशोर महाजन यांच्या नावाची चिठ्ठी राजोरा ता.यावल येथील पाचवीतील  विद्यार्थी योगेश राजेंद्र पाटील या मुलाने काढली त्यात  त्या विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. उपसभापती पदासाठी भाजपातर्ङ्गे लताबाई भगवान कोळी यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते.

ते बरोबर असल्याचे एकच ग्राह्य धरला त्याला सुचक योगेश दिलीप भंगाळे तर कॉंग्रेसचे उमाकांत रामराव पाटील यांना सरङ्गराज सिकंदर तडवी हे सुचक झाले. त्यांचेही २ अर्ज होते. यांनाही समसमान प्रत्येकी ५ मते पडली. त्यामुळे ईश्‍वरचिठ्ठीने कॉंग्रेसचे उमाकांत पाटील यांना साथ दिली. त्यामुळे ते विजयी  घोषित करण्यात आलेत.

निवडणूक अधिकारी  म्हणून तहसीलदार  कुंदन हिरे,  सहाय्यक बीडिओ वाय.पी.सपकाळे, संजय समदाने (नायब तहसीलदार) कक्ष अधिकारी  पं.स.यावल बबन तडवी यांनी कामकाज पाहिले. विजयानंतर सभापती, उपसभापती सह कॉंग्रेसचे कार्यकर्ते  यांची ढोल ताशांच्या गजरात पं.स. पासून खरेदी विक्री संघात मिरवणूक काढण्यात आली.

त्यात माजी आ. रमेश चौधरी,  प्रभाकर सोनवणे, लिलाधर शेठ चौधरी, मास्टर माईंड नितीन चौधरी, आर.जी. नाना पाटील, वसंतराव महाजन, शरद महाजन यांच्यासह आदी सामील झाले. खरेदी विक्री संघात सभापती, उपसभापती सह पाचही सदस्यांचा  सत्कार कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप भैय्या यांच्या हस्ते करण्यात आला.

पंचायत समिती यावलच्या  सभापती पदी माझी पत्नी कॉंग्रेसच्या पाठींब्याने सभापती झाली मी भाजपा स्थापनेपासून पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असुन आता सुध्दा आहे. केवळ ज्या उमेदवाराने पक्षाची बंडखोरी करून भाजपा उमेदवाराला पाडले अशी व्यक्ती पं.स.सभापदीपदी बसून नये म्हणून मी कॉंग्रेसचा पाठींबा घेतला.

मी व माझी पत्नी भाजपाचेच असून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, आ.एकनाथराव खडसे, ना.गिरिश महाजन, माझे नेते आ. हरिभाऊ जावळे, पक्षाध्यक्ष जिल्हा जळगाव उदय वाघ यांच्यावरच निष्ठा  अबाधित असून हेच माझे नेते आहेत.

त्यांच्याच मार्गदर्शनाने पं.स.मध्ये कारभार केला जाईल, अशी ग्वाही देतो, माझ्या या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुखावले असतील परंतु पं.स. यावलच्या सभापतीपदी भाजपाचीच व्यक्ती असावी म्हणून हे करावे लागले यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल पं.स.सभापती सौ.संध्या महाजन यांचे पती किशोर महाजन यांनी  दै.देशदूतशी बोलतांना मत व्यक्त केले.

सभापती पदासाठी उमेदवारी  नाकारल्याने संघर्ष -सभापती-सौ.संध्या महाजन

माझे पती ३५ वर्षापासून भाजपाचे सक्रिय कामकाज पाहतात. भाजपातर्ङ्गे मी विजयी झाली. सभापती पदासाठी उमेदवारी  नाकारल्याने व अपक्ष उमेदवाराला भाजपाने उमेदवारी दिल्यानेच मला संघर्ष करावा लागला.

कॉंग्रेसच्या चौघ सदस्यांनी  माझ्या विजयासाठी जे सहकार्य केले ते मी कदापीही  विसरणार नाही व माझ्या या विजयात यावल कृउबा माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी व कॉंग्रेस गटनेते यांचा सिंहाचा  वाटा आहे.

खरे सुत्रधार तेच आहेत. निवडणूक संपली आता सर्व जातीधर्माच्या नागरिकांना सोबत घेवून राजकारण कमी मात्र समाजकारण व विकास नजरेसमोर ठेवूनच माझ्या पक्षाचे नेत्यांच्या आशिर्वादाने काम करित राहीन.

LEAVE A REPLY

*