Type to search

जळगाव

यमुनानगरातील बंद घरातून 65 हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज लांबविला

Share

जळगाव । शहरातील अयोध्यानगर परिसरातील यमुना नगरातील कुटुंबिय भादली येथे मुळगावी गेले असल्याने त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आतप्रवेश करून कपाटातील 65 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

यमुना नगरातील रहिवाशी असलेले दीपक लक्ष्मण कोल्हे हे शेतकरी असून त्यांचे भादली गावी शेत आहे. दि.17 रोजी सकाळी 6 वाजता दीपक कोल्हे त्यांची पत्नी वर्षा यांच्यासोबत भादली येथे शेतावर गेले होते. सायंकाळी उशिरा असल्याने ते भादली येथे त्यांच्या घरीच थांबले. त्यामुळे यमुनानगरातील त्यांचे घर बंद होते. मध्यरात्री घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत लोखंडी कपाटातून 15 हजार रुपये किंमतीचे 10 गॅ्रमचे सोन्याचे मंगळसुत्र, 30 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम सोन्याचे लॉकेट, 15 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 5 हजार रुपये किंमतीचा चांदीचा छल्ला, जोडवे, बिचवे असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. गुरुवारी सकाळी दिपक कोल्हे गॅस हंडी भरण्यासाठी घरी निघून आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाज्याला कुलूप दिसून आले नाही. त्यांनी आत जावून पाहिले असता, घरातील सर्व सामान अस्तावस्थ फेकल्याचे त्यांना दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचे समजले. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिराच्या भिंतीजवळ उभी केली कार
चोरटे जिन्याने बाहेर पळत असतांना सुरक्षारक्षक यांचा मुलगा रोहीत मुखेडकर याच्या समोर तिन्ही चोरटे एका पांढर्‍या रंगाच्या कारमधून पळत होते. यावेळी रोहीत याने या कारचा नंबर लक्षात ठेवला. त्यानंतर त्याने कारवर दगड फेकून गल्लीच्या वळणापर्यंत कारचा पाठलाग केला. परंतु चोरटे बजरंग बोगद्यातून हायवेकडे पळाले. चोरट्यांनी त्यांची कार अपार्टमेंटच्या समोरील बाजूला असलेल्या महादेव मंदिराच्या भिंतीजवळ लावली होती. चोरटे एमएच 19 -7968 क्रमाकांच्या कारने आले असल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले. दरम्यान, डीवायएसपी डॉ. रोहन यांनी तात्काळ या गाडी नंबर वरून प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातून मालकाचा शोध घेण्याचा सूचना दिल्या. दरम्यान, चोरट्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले डॉ. पाटील यांचेच घर टार्गेट केले होते. परंतु याठिकाणी काहीही न मिळाल्याने समोरील बंद असलेल्या ललवाणी यांच्या फ्लॉटकडे चोरट्यांनी मार्ग वळविला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!