Type to search

क्रीडा

यंदाच्या विश्वचषकात 500 धावांचे लक्ष्य शक्य!

Share
लंडन । इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील धावसंख्येचा आढावा घेतला, तर आगामी विश्वचषक स्पर्धेत एखाद्या संघाकडून 500 धावांचा डोंगर उभा राहू शकतो, अशी शक्यता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातील एका अधिकार्‍याकडून वर्तवण्यात आली आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी तयार करण्यात येणार्‍या स्कोअरकार्डमध्ये 500 धावांसाठीच्या स्कोअरकार्डाचे विशेष डिझाइन करण्यात येत आहे. एक किंवा दोन पाउंड देऊन क्रिकेटप्रेमी आठवणींसाठी हे स्कोअरकार्ड खरेदी करू शकतात, असेही या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले. क्रिकेट सामना पाहण्यासाठी येणार्‍या क्रिकेट रसिकांसाठी त्या सामन्याचे स्कोअरकार्ड विक्रीसाठी ठेवण्यात येते. यामध्ये संपूर्ण सामन्याचा गोषवारा देण्यात आलेला असतो. आत्तापर्यंत 400 धावसंख्येपर्यंतचे स्कोअरकार्ड छापण्यात आले होते. मात्र, इंग्लंडमधील सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यास एखादा संघ 500 धावा फटकवू शकतो, असे कयास बांधण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर 500 धावसंख्या असलेले स्कोअरकार्ड तयार करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 481 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसर्‍या सामन्यात इंग्लंडने 3 गड्यांच्या मोबदल्यात 373 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने 361 धावा केल्या. इंग्लंडमधील सपाट धावपट्टीमुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नवनवीन विक्रम रचण्यात येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.टेलिग्राफ आणि नवभारत टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार यंदाच्या विश्वचषकात स्कोअर बोर्डमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 400 धावांपर्यंत स्कोअर बोर्डमध्ये स्केल होती. पण आता ही स्केल वाढवून 500 धावांपर्यंत करण्यात आली आहे.

त्यामुळेच इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला या विश्वचषकात पाचशे धावा होतील, असे वाटत आहे. याबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले आहे की, आम्ही स्कोअर बोर्डची स्केल बदलली आहे. कुणास ठावूक या विश्वचषकात 500 धावांचा इतिहासही रचला जाऊ शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!