Type to search

नंदुरबार

म्हसावद येथील स्मशानभुमीत साफसफाई

Share

शहादा । ता.प्र.- म्हसावद ता.शहादा या गावातील स्मशानभुमीत गावातील ग्रामस्थ व धनगर समाजातील तीन बांधव छोटू मोतीराम लांडगे, छोटू दंगल अडगळे, कृष्णाशेठ बोरसे यांनी आपल्या मुलांना सोबत नेऊन तेथील संपूर्ण घाण कचरा तसेच तेथील राख स्वतः मेहनतीने साफसफाई करून त्या ठिकाणी आठ खड्डे खोदून त्यात वृक्ष लावले.

त्यात कोणताही प्रसिद्धी हेतू न ठेवता हे कार्य निस्वार्थ केले त्यातून त्यांचे पर्यावरणाविषयी प्रेम आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी जागरूकता दिसून येते. नक्कीच भविष्यात लावलेल्या वृक्षांच्या सावलीमुळे श तीनही स्वच्छतादूतांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोण कुठली शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. ज्यांना समाजासाठी काही तरी करावे असे वाटते व आपण समाजाचे व पर्यावरणाचे काही तरी देणे लागतो, हा उदात्त हेतू ठेवला तर या प्रकारचे कार्य करण्यास माणूस स्वतःहून तयार होतो. वृक्ष संवर्धनासोबत तिघा भावंड व मुलांना सोबत घेवून स्मशानभूमीत केलेल्या साफ सफाईमुळे या परिवाराचे सर्व म्हसावद ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!