मोहाडीरोड परिसरातील महिलांचा पाण्यासाठी मनपावर मोर्चा

0

जळगाव |  प्रतिनिधी : मोहाडी रोड परिसरात महापालिका पाणी देत नसल्याने स्वखर्चाने परिसरात नागरिक पाईप लाईन टाकत असल्याने त्याला तरी मनपाने परवानगी द्यावी, यासाठी मोहाडी रोडवर असलेल्या खुबचंद साहीत्या टावर परिसरातील महिलांनी महापालिकेवर मोर्चा आणला. यावेळी त्वरीत पाईप लाईन टाकण्याची परवानगी देण्यासाठी पाणीपुरवठा विभागात निवेदन देण्यात आले.

जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर खुबचंद साहीत्य टावर परिसरात अनेक कुटूंबिय राहतात. या भागात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. यासाठी अनेकवेळा परिसरातील नागरिकांनी आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन दिली आहेत. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नसल्याने या भागातील रहिवाश्यांनी सामुहीक वर्गणी गोळा करुन त्यातून ४०० रुपये प्रति पाण्याचे टँकर मागवुन तहान भागविली जात आहे.

गेल्या तीन ते चार वर्षापासुन टँकरवर नागरीक अवलंबून आहेत. अखेर प्रकाश साहीत्या यांच्यासह नागरिकांनी महापालिकेच्या रायसोनी नगरजवळील दौलत नगर टाकीपर्यंत स्वखर्चाने पाईप लाईन टाकण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार त्यांना महापालिकेने मंजूरी दिली आहे.

मात्र, पाईपलाईन टाकण्याच्या कामास अद्याप परवानगी दिलेली नाही. ही परवानगी मागण्यासाठी या परिसरातील महिलांनी महापालिकेवर धडक दिली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांना याबाबत निवेदन दिले असून तात्काळ परवानगी देण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रकाश साहित्या, अनिता पवार, मीना घोडेस्वार, प्रतिभा पाटील,दिपाली बडगुजर, लताबाई ओतारी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*