मोहम्मद हाफीजची निवृत्ती

0
अबुधाबी । पाकिस्तान क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हाफीजने 20 ऑॅगस्ट 2003 साली बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 15 वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर तो कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे.

हाफीज म्हणाला, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होते. परंतु, मला आनंद आहे की, कारण मी माझ्या कारकिर्दीत खूप मेहनत घेतली. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत 15 वर्ष खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले.मोहम्मद हाफीजने पाकिस्तानकडून आतापर्यंत 55 कसोटी सामने खेळताना 104 डावांत 37.96 च्या सरासरीने 3 हजार 644 धावा केल्या आहेत. यात त्याने 10 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत.

मागील महिन्यांत ऑॅस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर मागच्या 7 डावांत हाफीजला केवळ 66 धावाच करता आल्या होत्या.

LEAVE A REPLY

*