LOADING

Type to search

मोहम्मद शमीविरोधात आरोपपत्र दाखल

क्रीडा

मोहम्मद शमीविरोधात आरोपपत्र दाखल

Share
नवी दिल्ली  भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या आशेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. खझउ 498 ( हुंड्यासाठी छळ) आणि 354 ( शारीरिक छळ) या कलमांतर्गत शमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जूनला होणार आहे. पत्नी हसीन जहाँच्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.

हसीन जहाँच्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी शमी याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. शमीचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप हसीन हिने केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ घालवला, असेही तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. अलीपोर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.

शमी आणि त्याची पत्नी हसीन यांच्यात बर्‍याच कालावधीपासून वाद सुरू आहेत. हसीन जहाँने आपला पती शामीचे बर्‍याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.अलीपोर पोलीस कोर्टासमोर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत शमीनं भारताचे प्रतिनिधित्व केले होते. चार सामन्यांत त्याने चार विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत शमीने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.कोलकाता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रांवर 22 जूनला सुनावणी होणार आहे. मात्र, 30 मे ते 14 जूलै या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

त्यामुळे शमीचे या स्पर्धेत खेळणे अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!