Type to search

नंदुरबार

मोलगी येथे विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर

Share

मोलगी ता. अक्कलकुवा | वार्ताहर – मोलगी-येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोलगी येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला.

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन,राजमाता जिजाऊ मिशन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कुटुंब कल्याण व आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय,नाशिक येथे तीन दिवशीय प्रशिक्षण तळोदा,धुळे प्रकल्पातील शिक्षक, अधिक्षकांना किशोरवयीन विद्यार्थ्यांना जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आश्रमशाळा मोलगी येथे देण्यात आले.या प्रशिक्षणासाठी राजश्री चौधरी व अधिक्षक दिलीप पावरा यांनी नाशिक येथे प्रशिक्षण घेतले. दिलीप पावरा यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयीन वयात येणारे विविध प्रश्न, आरोग्य, मनातील शंका, मुलगा मुलगी भेद,मानवी शरिराची ओळख, आपले शरीर, लिंग आणि लैंगिक ओळख, आपला या वयातला विकास म्हणजे काय?यांसारख्या विविध संवेदनशील विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देताना वातावरण मोकळे झाल्याचे विद्यार्थ्यांनी अनुभवले. राजश्री चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मानसिक व भावनिक ,सामाजिक बदल, केस स्टडीज, स्वच्छतेच्या आरोग्यकारक सवयी, हाताची स्वच्छता, मासिक पाळी बद्दलची माहिती, मुलामुलींमध्ये वयात येतांना झालेले बदल याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांना विविध खेळ, कविता, गाणे यांचा सराव करत वातावरण आनंददायी करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींनी मनमोकळेपणाने सहभाग घेत प्रशिक्षणाचा आनंद घेतला. या प्रशिक्षणाचा मुळ उद्देश मुलगा मुलगी हे वेगळे नसून एकच आहेत. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप नगराळे, माध्यमिक मुख्याध्यापक विठोबा चौधरी, संजय बोरसे, विजय चौधरी, राहुल पाटील, राजश्री चौधरी, स्वप्निल सोनार, शिवदास वसावे, कल्पेश मावची, योगिता वळवी, ज्योती तडवी, दिलीप पावरा,प्रमिला सोनवणे,लोटन पावरा, अनिल गावित, दिलवरसिंग वळवी, यशवंत वळवी आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!