Type to search

नंदुरबार

मोलगी आश्रमशाळेत जन्माष्टमी उत्साहात साजरी

Share

मोलगी ता. अक्कलकुवा| वार्ताहर – येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोलगी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नृत्य व दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक दिलीप नगराळे व मुख्याध्यापक विठोबा चौधरी यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विठोबा चौधरी यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस आपण का साजरा करतो याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक दिलीप नगराळे यांनी दहिहंडी करताना एकिचे बळ कसे काम करते व संतुलन कसे राखावे याविषयी सांगितले. यानंतर आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींंनी राधाकृष्ण यांच्या वेषभुषेत नृत्य करत जन्माष्टमी साजरा केली. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दहिहंडी लावून स्पर्धा घेण्यात आली.यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्साह वाढविला.एकापाठोपाठ थर लावत उपस्थित गावकर्‍यांनी दाद दिली असता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.

नृत्य स्पर्धेत पुनम अहिरे, दिक्षा अहिरे, निलिमा पाडवी,सुस्मिता राऊत,रोहन अहिरे आदी विद्यार्थ्यांनी सहभागी होत दहीहंडीचा उत्साह वाढविला. यावेळी आश्रमशाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप नगराळे, माध्यमिक मुख्याध्यापक विठोबा चौधरी, स्वप्निल सोनार, शिवदास वसावे,योगिता वळवी, कल्पेश मावची,ज्योती तडवी, लोटन पावरा,अधिक्षक दिलीप पावरा,प्रमिला सोनवणे, दिलवरसिंग वळवी,यशवंत वळवी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पेश मावची यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!