Type to search

धुळे

मोराण्यातील निवासी शाळेतील विद्यार्थ्याचा संशायस्पद मृत्यू

Share

धुळे । मोराणे प्र.ल. येथील स्व. तात्याराव पाटील निवासी मतीमंद विद्यालयातील 20 वर्षीय विद्यार्थ्याचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबत प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मोराणे प्र.ल. येथील स्व. तात्याराव पाटील निवासी मतीमंद विद्यालयात रोहित पारेश पवार (वय20) हा शिक्षण घेत आहेत. त्याच्या पोटात बुधवारी दुपारी त्रास होवू लागला. त्यानंतर त्याला जुलाब व उलट्या झाल्या. त्यामुळे रोहितला प्राथमिक स्वरुपात गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे त्याला थोडे बरे वाटले. परंतु पुन्हा रात्री त्रास होवू लागल्याने दीड वाजेच्या सुमारास शाळेतील कर्मचार्‍यांनी त्याला पुन्हा गोळी दिली. व तो झोपी गेला. आज सकाळी नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना झोपेतून उठविण्यात आले. त्यावेळी रोहितने प्रतिसाद दिला नाही. त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रोहितच्या अंगावर चट्टे
झोपेतच रोहितच्या अंगावर निळे चट्टे आल्याचे दिसून आले. परंतु हे चट्टे कशामुळे आले याचा उलगडा होवू शकला नाही. रोहितच्या शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

आई-वडिलांनी फोडला टाहो
रोहित हा मुळचा अमळनेर तालुक्यातील राहणारा होता. परंती त्याला शिक्षणासाठी निवासी विद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या आई-वडीलांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. ते सर्वोपचार रुग्णालयात आले असतांना त्यांनी रोहितचा मृतदेह पाहिल्यानंतर एकच टाहो फोडला. यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!