मोराणे वीज वितरण कार्यालयातून वायर चोरी

0
धुळे / मोराणे येथील वीज वितरण कार्यालयातून 65 बंडल वायरचे सुमारे 23 हजार रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मोराणे येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने 23 हजार रुपये किंमतीचे 65 बंडल वायरचे चोरुन नेले.
याबाबत विनायक प्रल्हाद बोरसे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379, महाराष्ट्र विद्युत कायदा सन 2003 चे कलम 136 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा छळ – पाटण, ता.शिंदखेडा येथे राहणारी ज्योत्स्ना सिध्दार्थ जगताप या विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेवून व नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून ज्योत्स्नाचा छळ केला. तसेच तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून तिला माहेरी हाकलून दिले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात ज्योत्स्ना सिध्दार्थ जगताप हिने फिर्याद दिली. भादंवि 498 (अ), 406, 504, 34 प्रमाणे विवाहितेचा पती सिध्दार्थ जगदेव जगताप, सासू जयश्री जगदेव जगताप, सासरे जगदेव जगन्नाथ जगताप, नणंद स्वाती जयदेव जगताप, मामसासरे कांतीलाल मनोहर शिंपी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात ठार – वाहन भरधाव वेगाने चालवून समोरुन येणार्‍या मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात राहूल लक्ष्मण घुणावत (वय 35), रा.ब्राह्मणगाव हा ठार झाला. तर डिगंबर हिरामण राजकुंवर हा जखमी झाला आहे. तसेच मोटारसायकलचे नुकसान झाले. याबाबत महेंद्र देविदास माळी यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन भादंवि 304 (अ), 279, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 134, 177 प्रमाणे पद्माकर योगराज पाटीलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*